नाशिक मिरर : प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे नाशिकचे निलेश मधुकरराव राणे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) मध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांनी ९ वर्षांत राज्यातील व इतर काही राज्यातील ग्रामीण ४ हजार खेळाडूंना मार्गदर्शन व अचूक प्रशिक्षण दिले आहे, याच रेकॉर्डची दखल `वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या लंडन टीमने घेतली व हा रेकॉर्ड त्यांच्या नावे केला गेला.

 राणे यांना रेकॉर्डचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह इंदोर येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान   केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रख्यात गायक उदीत नारायण व वर्ल्ड बुक रेकॉर्ड (इंग्लंड)चे चेअरमन दिवाकर सुकुल व इंडियाचे अध्यक्ष संतोष शुक्ला उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!