नाशिक मिरर : प्रतिनिधी

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने `कै. मनोहर उपाख्य आप्पासाहेब भगवंतराव कुलकर्णी’ ही जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा झाली. संस्थेच्या आठवले-जोशी बाल विकास मंदिर, मेरी येथे ही तीन दिवसीय स्पर्धा झाली. स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे.

तीन गटांत स्पर्धा

इयत्ता १ ली ते ४ थीच्या गटात १८५ स्पर्धक होते. गटप्रमुख म्हणून मनिषा गुंजाळ यांनी काम पाहिले. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या गटात १७३ स्पर्धक होते. गटप्रमुख म्हणून शर्मिला डोंगरे यांनी काम पाहिले. इयत्ता ८ वी ते १०वीच्या गटात १३८ स्पर्धक होते. अशाप्रकारे जिल्ह्यातून एकूण ४९६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

परीक्षक हे होते

स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहिनी भगरे, सुनिता सोनवणे, ज्ञानेश्वरी शिंदे, सुनीता चौहान, आरती शिरवाडकर, मीनाक्षी सोळुंके, रंजना आहारावर, गिरीश गर्गे, जयश्री गांगुर्डे,भाऊसाहेब कुवर, सोनाली चिंचोले, गौरी बेळे, प्रांजली आफळे, वीणा मुठाळ, शामल पाटील, लता कांबळे, अर्चना झोटींग, शैलेंद्र भामरे यांनी काम पाहीले.

यांची उपस्थिती

स्पर्धेप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयंतराव कुलकर्णी, उपाध्यक्ष उदय शेवतेकर, कार्यवाह अनिल कुरविनकोप, सहकार्यवाह सुधीर पाटील, स्पर्धा प्रमुख व शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम महाजन, संस्थेचे सदस्य शरद जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, शशांक ईखणकर व बन्सीलाल अंदोरे, संस्थेचे विश्वस्त राजेंद्र सराफ, तसेच प्रज्ञा आखेगावकर आदी उपस्थित होते. गुरुवारी दि.30) या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.

बातम्या

Don`t copy text!