नाशिक मिरर वेबटीम  : सातपूर परीसरात अज्ञात चोरट्यांनी मटण विक्रेत्यांच्या तब्बल २२ बकरे १८ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरून नेले आहे.सदर चोरी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर परिसरातील श्रमिकनगर मधील बागलाण मटण व चिकन शॉप आहे. शॉप चे मालक हुसैन खाटीक हे बकरांना चारापाणी देऊन दहा वाजता घरी गेले व सकाळी चारापाणी देण्यास आले असता हि घटना उघडकीस आली. गोट्याचे लाँक तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री च्या सुमारास २२ बकरे चोरीस गेले आहे.अज्ञात चोरट्यांविरूद्ध सातपूर पोलिसात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह. अंदाजे दोन लाख रुपये पेक्षा जास्त किंमती च्या बकऱ्या होत्या अशी माहिती शॉप मालकांनी दिली .चोरट्यांनी चोरी करण्याच्या आधी त्यांनी गाडीच्या पाहण्यानी सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला.सीसीटीव्ही वरील फक्त काच फुटली.चोरटे सीसीटीव्ही कँमेरात कैद झाले. त्यांनी चोरी करण्यासाठी एनोव्हा गाडीचा वापर केला आहे.सीसीटीव्ही कॅमेरा मधी गाडी व गाडीचा नंबर व चोरट्या चा चेहरा दिसत आहे.एक महिन्यापूर्वीही अशीच प्रकारची घटना अंबड परिसरात घडली आहे.

बातम्या

Don`t copy text!