नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सातपूर :नाशिक मिरर वेबटीम  सातपूर येथील शिवाजी नगर मध्ये मस्जिद-ए-गरीब नवाज येथे नियाज-ए-गौस चे आयोजन करण्यात आले होते. तसेच मस्जिद जवळील चौकास गरीब नवाज चौक असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उदघाटक नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील युवा ऊर्जा फाऊंडेशन,अध्यक्ष हे उपस्थित होते. त्याच बरोबर मस्जिद चे मौलाना ,मस्जिद ची कमेटी ,शिफा सोशल फाऊंडेशन चे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक ही उपस्थित होते.याप्रसंगी दिनकर पाटील व अमोल पाटील यांचा सर्व धर्म समभाव हा गुण पुन्हा एकदा दिसून आला. त्यांनी केलेले समाजकार्य व जनतेची सेवा बघून शिवाजी महाराजांची आठवण येते ,ज्याप्रमाणे महाराज जनतेची सेवा निस्वार्थ भावनेने करत प्रत्येक धर्माला योग्य तो न्याय देऊन सोबत घेऊन चालायचे, त्याचप्रमाणे नगरसेवक पाटील व अमोल पाटील यांचे प्रभाग मध्ये नाशिक जिल्ह्यात कार्य आहे. कोणत्याही धर्माचा व जातीचा किंवा गरीब श्रीमंतांचा द्वेष न करता त्यांचे समाजकार्य अविरत सुरू आहे.मस्जिद-ए-गरीब नवाज व शिफा सोशल फाऊंडेशन तर्फे सर्व उपस्थिताचे आभार व्यक्त करण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!