नाशिक मिरर वृत्तसेवा : येथील जोती जन्मोत्सवानिमित्त यंदा शौर्यगाथा कर्तुत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्टेज व मंडप भूमिपूजनाचे उद्घाटन नुकतेच सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले आहे.
सातपूर अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर ज्योती जन्मोत्सव समिती २०२५ च्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान सोनवणे यांच्या हस्ते स्टेज व मंडप भूमिपूजन पूजा सत्यशोधक पद्धतीने करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून माजी सभागृहनेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक सुरेश भंदुरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, योगेश गांगुर्डे , आबा गांगुर्डे, कांतीलाल भंदुरे, बाळासाहेब जाधव, पंकज निकम, हिरामण रोकडे, हेमंत नागरे, पंकज नागरे, किशोर निकम, अरूण घुगे, नाना वाघ, विजय बुरुकुल, ज्ञानेश्वर निगळ, कैलास सानप, रोहिणी देवरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष इंजि. प्रवीण नागरे, कार्याध्यक्षा निलिमा जेजुरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, उपाध्यक्ष जानव्ही तांबे, सरचिटणीस काळू काळे, चिटणीस सोनाली भंदुरे, सचिव अश्विन महाजन, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदीसह श्रीराम मंडळ, मच्छिन्द्र माळी, पोपटराव जेजुरकर, राहुल साळुंखे, प्रकाश खैरनार, शिवाजी काळे, हेमंत शिरसाठ, सिए मनोज तांबे, गोकुळ तिडके, तुषार भंदुरे, पवन दोंदे आदीसह ज्योती जन्मोत्सवाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष इंजि. प्रवीण नागरे, कार्याध्यक्षा निलिमा जेजुरकर यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
