नाशिक मिरर वृत्तसेवा:
स्त्री शिक्षणासाठी फुले दांपत्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी फूले दांपत्याने घेतलेला ध्यास शौर्यगाथा कर्तुत्वाची या कार्यक्रमातून उलगडला.
सातपूर येथील गुरु शिष्य जयंती प्रणित ज्योती जन्मोत्सव समिती २०२५ ने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने सावरकर नगर येथील जाणता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तुत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमांमध्ये विविध गाणे, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग, शेतकरी गीत गाणे, खंडोबाची गाणी, अशी वेगळ्या प्रकारची गाणे सादर करण्यात आली होती.
या कार्यक्रमास सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती जन्मोत्सव कार्यकारणी २०२५ च्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाचे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,शिवसेना नेते विजय करंजकर ,माजी सभागृह नेते दिनकर पाटील,रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे ,भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय रणजित नलवडे, माजी नगरसेवक सुरेश भंदुरे, शशीकांत जाधव, भागवत आरोटे, नंदूशेठ जाधव,माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, उषा शेळके, माधुरी बोलकर ,दीक्षा लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, अमोल पाटील ,जुनेद शेख ,राजेश दराडे , जि.एस.साळवे, बाळासाहेब जाधव, बाळा निगळ, समाधान देवरे,माया काळे,वृषाली सोनवणे, नरेश सोनवणे,भिवानंद काळे, महेंद्र शिंदे, बजरंग शिंदे, किशोर मुंदडा,विजय बुरकूल,इंद्रभान सांगळे, बाळासाहेब जाधव, नाना वाघ, विश्वास अप्पा नागरे, शरद शिंदे, शिवजन्मोस्तव समिती अध्यक्ष जीवन रायते आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, देवा जाधव, दीपक वाकचौरे ,सातपूर गुढीपाडवा समिती, सातपूर विविध कार्यकारी सोसायटी, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान दीपक नागरे ,निलेश बोडके,किरण गुंबाडे, दीपक भावले, भाऊसाहेब बोराडे, गणेश भावले, योगेश भावले, भगवान काकड, गिरासे साहेब, महेंद्र शिंदे, प्रविण पाटील, दत्ता पाटील,योगेश गांगुर्डे, रवि देवरे ज्ञानेश्वर पहेरे, बाळू थोरात रामहरी सभेराव, संजय राऊत, लोकेश बाळा गवळी,ज्ञानेश्वर बगडे,लखन कुमावत, ऋषि खराटे,श्री संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था चुंचाळे सर्व पदाधिकारी सदस्य,संत सावता माळी मंडळ श्रमिक नगर,क्रांतीसुर्य फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले. तर आभार कार्याध्यक्ष सौ नीलिमा पोपटराव जेजुरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजीनियर प्रवीण नागरे, कार्याध्यक्ष निलिमा जेजुरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, जानवी तांबे, सरचिटणीस काळजी काळे, चिटणीस सोनाली बंधुरे, सचिव अश्विन महाजन, यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, भारत जाधव, अनिल माळी, राहुल साळुंखे, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, शिवाजी काळे, हेमंत शिरसाट, सीए मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, पवन दोंदे, गोकुळ तिडके, तुषार बंधुरे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, हर्षल मोरे यांनी केले आहे.

