नाशिक मिरर :

नाशिक महानगरपालिका सातपूर विभाग मधील प्रभाग क्रमांक ९ मधील अमृतगार्डन ते बारदान फाटा मोतिवाला कॉलेज दरम्यान रस्ता दुभाजकाचे काम सुरु आहे . परंतु सदरच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरच्या रस्त्यालगत महेंद्रा कंपनी गेट , पार्थ पॅलेस , कार्बन नाका , सात माउली चौक हा अत्यंत गजबजलेला रहदारीचा परीसर असून सदरच्या परीसरालगत मोठ्या प्रमाणात छोटे मोठे व्यावसायिक आहेत . चालु असलेल्या दुभाजकाच्या कामामुळे महेंद्रा कंपनी गेट , पार्थ पॅलेस , कार्बन नाका , सातमाउली चौक या भागातील रस्तालगत वाहनचालकांना रस्ताच शिल्लक नाही.दुभाजक कामामुळे खूप अरुंद झाला आहे.

कार्बन नाका व महिंद्रा कंपनी गेट लगतच्या बाजूस ट्रक व मोठमोठे कंटेनर उभे राहत असल्याने वाहतूकीस अडथळा होत असतो.रस्ता दुभाजकाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी आता रस्ताच अस्तित्वात नाही . प्रथमतः रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक असतांनाही कोणत्या प्रकारचे मोजमाफ न करता रस्ता दुभागाजकाचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण झालेला आहे. सदर समस्या बाबत छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना लेखी निवेदन दिले आहे. रस्ता दुभाजकाचे काम सुरु झाल्यापासून अपघातात वित्तहानी होवून तीन व्यक्तीची जिवीत हानी देखील झालेली आहे . चुकीच्या पध्दतीने सुरु असलेल्या या रस्ता दुभाजकाच्या कामाची पाहणी करून सदरच्या कामास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना सामाजिक कार्यकर्त्यां सविता गायकर, प्रमोद जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सदाशिव माळी, नवनाथ शिंदे, साहेबराव जाधव, बाळा जारे, महेश आहेर, सम्राट सिंग, अविनाश गायकर, प्रितेश पाटील, गिरीश आहेर, नितीन पाटील, संतोष पवार, किरण बोरसे, वैभव दळवी, प्रवीण इंगोले, सोनू काळे व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

 

सध्या नाशिक महापालिकेच्या वतीने काही नगरसेवकांच्या मागणीनुसार अमृत गार्डन ते बारदान फाटा या रस्त्यावर डीवाईडर चे काम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असून पहिले रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे असताना सुद्धा ते न करता फक्त निवडणुका तोंडावर आहे म्हणून स्वतःचे काम दाखवण्याचा प्रयत्न काही नगरसेवकांचा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये अनेक अपघात होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेली आहे काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे मी मनपा आयुक्तांना निवेदन दिलेले आहे. हे काम त्वरित थांबवावे आणि हे करून सुद्धा जर आमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर मोठे जनांदोलन या रस्त्यावर केले जाईल. आणि यानंतर कुठलीही जीवित हानी झाली तर कोर्टामार्फत संबंधित अधिकारी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. – करण गायकर,
संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना

बातम्या

Don`t copy text!