नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये नाशिक-त्र्यंबकरोड वरील सातपूर आयटीआय मागील रस्त्याच्या कडेला ताटी विक्री करताना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्याचा ढीग फेकून दिलेला दि.१६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आला.याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर परिसरात अवैधरित्या ताटी विक्री केली जात असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवाई वरून लक्षात आले आहे.यामध्येच ताटी विक्री करण्यासाठी ताडीची पैंकीग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हजारो प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर अज्ञात व्यक्ती फेकून दिल्या आहेत.सदर पिशव्या कोणी फेकल्या ही माहिती अजून समजली नसून पण सदर पिशव्या वरून परिसरात अजूनही अवैध रित्या ताडी विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण होऊ नये यासाठी ४० मायक्रोन पेक्षा कमी पिशव्या वापरण्यास बंदी असून देखील सदर पिशव्या वापरल्या जात होत्या. सदर कचऱ्या बाबतची माहिती मनपाच्या सातपूर विभागीय कार्यलयास कळवण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.सातपुर मधील अनधिकृत ताडी दुकान बंद जरी केले असले तरी , सातपुर राजवाडा मधील ऐका म.न.पा कर्मचाऱ्याची घर भाडेतत्वावर घेऊन तेथून आपली दुरध्वनी च्या माध्यमातून दुकानदारी चालु आसल्याची चर्चा मात्र परिसरात थांबण्याच्या मार्गावर दिसत नाही.
