तीन अल्पयीन युवकांचा सहभाग

नाशिक मिरर: वृत्तसेवा  शिवाजीनगर भाग्यलक्ष्मी वदंन विठ्ठल मंदिर परिसरात मंगळ रात्री एक वाजेच्या दरम्यान तीन अल्पवयीन टवाळखोरांकडून परिसरात हातात कोयते फिरवत शिवा गिळ करत चार घरावर दगडफेक करत पाच गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यलक्ष्मी वदंन अपार्टमेंट परिसरात रवींद्र खोडे यांची एम एच 15-जे एच 4850या मारुती गाडीची समोरून काच फोडली,गोविंद सबगर यांची आयषर क्रमांक एम एच 15 जेसी 9606 यांच्या गाडीची काच, मनोज मटाले यांच्या इतीयास गाडीवर कोयता मारला,किरण अहिरे यांची आयषर

एम एच41एयू0193 समोरून काच फोडत नुकसान केले. समोरच राहणाऱ्या तीन घरावर दगड फेककेली यात निलेश गोपाळ यांच्या बेडरूम काच फोडत नुकसान केले आहे. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केले असता काही तासातच घटनास्थळी संशयित ताब्यात घेतले.यावेळी नागरिकांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

112 ला कॉल अन पोलिसांची तत्परता 

 

घरावर शिवागीळ करत दगडफेक व गाड्याची तोडफोड केल्यानंतर व कोणालाही बोलवा आमच्या कोणी काही करू शकत नाही असे बोलत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी 112 ला कॉल केल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, पाण्याच्या टाकीजवळ लपलेले तिघे संशयित अल्पवयीन एका ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले. या समाजकंठकाकडून वाहनांच्या नुकसानीची भरपाई घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

या आधीही काचा फोडल्या

 

 जुना गंगापूर जकात नाका जवळ 18फेब्रुवारी 2023 गंगापूर रोड कडून नाशिक कडे जाणाऱ्या पाच ते सहा गाड्यावर दगड फेक करत काचा फोडल्याची घटना घडली होती.

 

 चार डिसेंबर 2023 फुलेनगरला तीन गाड्या फोडल्याची घटना घडली होती.

 

 19 फेब्रुवारी 2024 श्रमिक नगर सात माऊली चौक येथे पाच गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या.

 

 19जून 2021 सातपूर कॉलनी जिजामाता शाळेजवळ गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या.

 

 यातील काही आरोपी अल्पवयीन होते. तर काही लगेच जांमीनावर सुटून मोकळे झाले आहे. गाड्या फुटून कष्टकरी कामगारांची नुकसान झाले अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.

 

नुकसान कोण भरून देणार 

गाड्यांच्या काचा फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संशय दुसऱ्या दिवशी सुटून जातात,नुकसान कोण भरून देणार

 रवींद्र खोडे.. (यांच्या गाडीची काच फोडली)

 

Don`t copy text!