नाशिक मिरर वेबटीम : सातपूर परिसरांतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असुन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी आता आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय पाटील ,शुभम राजगुरू यांच्यावर कारवाई करत शनिवारी त्यांच्या घराच्या परिसरात आणि भाई गिरी करणाऱ्या त्याच्या व गल्लीत दहशत माजविण्याच्या ठिक ठिकाणाहून धिंड काढण्यात आली. पाटील व राजगुरु यांच्यावर वेगवेगळे अनेक गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली व या ही पुढे गुन्हेगारी मोडीत काढ़ण्यासाठी सातपूर पोलिस प्रयत्न करणार आहे.असे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरेंनी सांगितले.
