नाशिक मिरर  : प्रतिनिधी
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील वरूणा नदी व सीता सरोवर परिसरात शनिवारी (दि.2) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या ऐतिहासिक वास्तूचे महत्व नाशिककरांनाच नाहीतर सर्व देशात घेऊन जाण्याचा मानस आहे. म. गांधी जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उखाडेंसह स्वच्छता करणारे महापालिकेचे कर्मचारी नामदेव माळी व सहकारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमात सहभागी संस्था अशा : 

गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम, पोलिस मित्र परिवार समन्वय समिती, श्री गुरुस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, दीव्यदृष्टी संस्था, आम्ही सेवेकरी.

सीता सरोवराची स्वच्छता करतानाचा व्हिडिओ 

यांची उपस्थिती

यामध्ये सुनील परदेशी, गणेश पेलमहाले, प्रकाश उखाडे,अशोक वराडे, प्रतिक देशमुख, गायक दर्शन गांगुर्डे, संदीप अवधूत, नितीन पगारे, सरिता पगारे, विजया जाधव, वंदना परदेशी, क्षितीजा खटावकर, वैजयंती सिन्नरकर आदी उपस्थितीत होते.

आरतीसह वाढदिवस करू

याठिकाणी दर पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करून आरती करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचा वाढदिवसही येथे सायंकाळी आरती करून साजरा करण्यात येईल.

– गणेश पेलमहाले, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी – राष्ट्रवादी काँग्रेस,  म्हसरूळ

ऐतिहासिक वारसा जपू

म्हसरूळ परिसरातील सीता सरोवराला ऐतिहासिक वारसा आहे. तो जपण्यासाठी, तसेच वरुणा (वाघाडी) नदी वाचवून पर्यावरण रक्षणासाठी ही मोहीम राबविली.

– सुनील परदेशी, सामाजिक कार्यकर्ते, म्हसरूळ

बातम्या

Don`t copy text!