जळगांव : नाशिक मिरर वेबटीम बहिण व भाच्याच्या मृत्यूस आपला मेव्हणाच जबाबदार असल्याचा मनात धरून एकाने आपल्या मित्रासह मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.याबाबत वृत्त असे की, मयत राजु शामराव मिरटकर (वय २८,रा.मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता. राजू हा मे २०२० मध्ये पत्नी व मुुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू होऊन यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक रामेश्वर गायकवाड (वय २२, रा.कोथळी ता.मोताळ. जि.बुलढाणा) याला आपल्या मेव्हण्याने बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला.
या अनुषंगाने ९ ऑक्टोबर रोजी राजु हा भाच जावायासोबत मोताळा येथे गेला होता. तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहिण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी ३० ऑक्टोबर रोजी बोरखेडी ता. मोताळा पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दि.२० नोव्हेंबर रोजी हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला.
