१. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष

२.सातपूर विभागीय मनपा कार्यालय

३. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय

४. धम्म सागर प्रबोधन संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ

५.संकल्पित रिपाई पार्टी

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातपूर पोलीस स्टेशनला संविधान भेट

सातपूर : संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातपूर पोलीस स्टेशन ला संविधान प्रास्ताविका प्रत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार पनाळे यांना देण्यात आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला सर्व समाजघटकांना,सर्व नागरीकांना समान न्याय व हक्क देणारे एक सुंदर असे संविधान दिले.त्या अनुषंगाने आज दि.२६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातपूर येथे येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.पक्षाच्या वतीने संविधान प्रास्ताविका सातपूर पोलीस स्टेशन ला भेट म्हणून देण्यात आली.यावेळी युवा नेते बिपिन कटारे,नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू बागुल,प्रशांत कटारे,नाशिक जिल्हा संघटक महेंद्र तेजाळे,नाशिक शहर संघटक प्रशांत शिंदे,सातपूर श्रमीकनगर युवा आघाडी सौरभ अहिरे,अजित सिंग
आदी उपस्थित होते.
सातपूर :सातपूर पोलीस स्टेशनला संविधान दिनानिमित्त संविधानाची प्रत भेट देते वेळी बिपिन कटारे, बाळासाहेब साळवे, जितू बागुल,प्रशांत कटारे, महेंद्र तेजाळे, प्रशांत शिंदे, सौरभ अहिरे,अजित सिंग आदी.

सातपूर विभागीय मनपा कार्यालयसातपूर :दि. 26 नोव्हेबर
संविधान गौरव दिना निमित्त सातपूर विभागीय कार्यालयातील
सातपुर प्रभाग समिती सभापती कार्यालयात प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्या हस्ते संविधान पुजन करण्यात आले.तसेच संविधाना चे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण वंदन करण्यात आले .या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुन काळे, विभागीय अधिकारी नितीन नेर, माधुरी तांबे, विश्वास कांबळे, कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विजय गवारे यांनी केले.
सातपूर : सातपूर विभागीय मनपा कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करते वेळी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर मध्ये भारतीय संविधान दिन साजरा

सातपूर : विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर शाळेमध्ये प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले होते. संस्थेचे सरचिटणीस प्रा. डॉ. के. के जाधव यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यास संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले, उपाध्यक्ष रामनाथ शिंदे , सरचिटणीस प्रा डॉ के के जाधव, सहचिटणीस दादा शिंदे खजिनदार संपत आहेर, सदस्य बन्सीलाल रायते, नरेंद्र वाणी, नारायण पवार, पंढरीनाथ शिंदे, तज्ञ संचालक बाबुराव चव्हाण, संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सखाराम पवार, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुदाम दाणे, पर्यवेक्षिका उज्वला जगदाळे, अण्णासाहेब गुंडगळ, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

धम्म सागर प्रबोधन संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ यांच्या वतीने ७१ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरासातपूर : सातपूर कॉलनी येथील जेतवन बुद्ध विहार येथे आज ७१ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.धम्म सागर प्रबोधन संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ, सातपूर कॉलनी यांच्या वतीने जेतवन बुद्ध विहारात संविधान दिन साजरा करण्यात आला.संविधान पुस्तिकेचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, यावेळी उपस्थितीतानी संविधानाचे महत्त्व विशद केले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मसागर प्रबोधन संघाचे बाळासाहेब खरे होते,या प्रसंगी मनोज अहिरे,यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर जगताप, दिलीप काळे,सुभाष केदारे,भाईदास सोनवणे, भीमराव जगताप, नवनाथ बनसोडे,राजेन्द्र सोनवणे, के,आर, संसारे,अशोक पाटील,आदी व समाजबांधव उपस्थित होते.

संकल्पित रिपाई तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त अभिवादननाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे संविधान दिनानिमित्त शालिमार येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संकल्पित रिपाईचे नेते प्रकाश पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान मूल्य जपली पाहिजे. व तेप्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रकाश पगारे यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमास विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाचे नेते राजा वाघले ,सामाजिक कार्यकर्ते देविदास दिवेकर, संजय भालेराव, एकनाथ मोरे ,नानासाहेब पटाईत, किशोर सुगंधी,रमेश म्हस्के, युवराज शेगावकर ,राजेंद्र औटे, चंद्रभान पगारे व बाळासाहेब गांगुर्डे उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!