नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर
येथील पवार संकुल मधील कृष्ण मंदिर मध्ये दि. १६ जानेवारी ते १८ जानेवारी सायं ७ ते १० या वेळेत शिवपुराण कथा कार ह.भ.प सुदर्शन महाराज शिंदे यांची संगीतमय शिवमहापूराण कथा चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१९ जानेवारी रविवार रोजी ह.भ.प लहू महाराज अहिरे यांचे दु. 3 ते ६ या वेळेत काल्याचे कीर्तन, तसेच संतोष कराळे यांचा मराठी भावगीत व भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.रविवार ८ वाजे नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम आयोजन ग. भा.अनुसया दगडू पवार यांची शतकपूर्ती अमृतमहोत्सव सोहळा निमित्ताने ह.भ.प तानाजी दगडू पवार, कौशल्या तानाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार,नवनाथ पवार,नितीन पवार,किशोर पवार,ज्ञानेश्वर पवार यांनी केले असून,सातपूर व प्रभाग १० मधील सर्व नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

