प्रशासनाकडून विविध मार्गदर्शन सूचना

नाशिक मिरर वृत्तसेवा : आरटीईअंतर्गत बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.१४) पासून सुरू झाली आहे. प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत शासनाच्या आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्धिपत्रक देत काही मार्गदर्शक सूचनादेखील त्यात देण्यात आल्या आहेत.

 

आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वर्ष २०२५-२६ साठी तालुका व शाळा स्तरावरील मदत कक्ष अद्ययावत व कार्यरत केले आहे. तालुका व शाळा स्तरावरील मदत कक्ष संपर्क अधिकारी व संपर्क क्रमांक याबाबतची नोंद शालेय शिक्षण, क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आरटीई २५ टके अॅडमिशनपोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

 

https://student.maharashtr a.gov.in/ad msportal या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

 

शाळा प्रवेशासाठी वालकाचे किमान वय इयत्ता पहिलीसाठी १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९पर्यंत वयोमर्यादा असून, ३१ डिसेंबर २०२५ रोजी किमान वय ६ वर्षे व कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस इतके असणे आवश्यक आहे, आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. तसेच प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यासाठी आरटीई २५ टक्के पोर्टलवरील माहितीपत्रकाचा संदर्भ घेण्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात ९९ शाळांची नोंदणी

 

संबंधित शाळांची पडताळणी प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होती. ही मुदत ४ जानेवारीला संपली. यातून राज्यातील आठ हजार ६२४ तर, नाशिक जिल्ह्यातील ४०५ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंद केली आहे. त्या माध्यमातून एक लाख पाच हजार जागा उपलब्ध होणार आहे.

 

पालकांकरीता सूचना (2025-2026)

 

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

 

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

 

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !

 

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

 

5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

 

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

 

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

 

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

 

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

 

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

 

11) RTE २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.

 

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

 

13) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

 

14) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

 

16) बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com OR educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा

 

बातम्या

Don`t copy text!