नाशिक मिरर वेबटीम : सातपूर अंबड लिंक परिसरातील उघड्यावर मास विक्री करणाऱ्यावर दुकानावर सातपूर अतिक्रमण पथकाने कारवाई करत ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सातपूर परिसरात सर्वत्र खुले व रस्त्यावर मास मच्छी चिकन विक्री करण्यात येत होती.यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत अनेक समस्या निर्माण होत होत्या.सातपूर प्रभाग सभेत ही या बाबत सर्वच नगरसेवक आक्रमक होत या अतिक्रमण बाबत जाब विचारला होता.शनिवार (दि २६)सायंकाळी ६ वाजता कारवाई करत ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला. विभागीय अधिकारी नितिन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख मिलिंद जाधव, सातपूर विभाग, श्रीराम गायधनी, पश्चिम विभाग, प्रदीप दप्तरे, पूर्व विभाग या ३ विभागाद्वारे संयुक्त मोहीम राबवून ३ ट्रक साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली. या वेळी ३ ट्रक साहित्य जप्त करत पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई ईशारा या वेळी देण्यात आला.

बातम्या

Don`t copy text!