नाशिक मिरर : वृत्तसेवा
नाशिक येथील जेसीआय नाशिक न्यू गोदावरी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजन पाथर्डी फाटा येथील हॉटेल मध्ये करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणुन जी. सुब्रमण्यम राष्ट्रीय प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक अनुपम तिवारी, झाकीर हुसेन शेख हे उपस्थित होते. या उच्च शिक्षित आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून संस्थेतील महाराष्ट्र राज्य व नाशिक मधील एकूण १३ झोन मधील ११० अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यात प्रामुख्याने व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण , जनसंपर्क, सोशल मीडिया,तंत्रज्ञान प्रभावी वापर, सभाषण कौशल्य, विपरीत परिस्थित समायोजन कसे करावे, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास कसा वाढवावा, ग्रुप डिस्कशन आणि निर्णय क्षमता, समावेश होता. शिबिरामध्ये डॉक्टर, वकील, विविध आस्थापना मध्ये काम करणारे व्यवस्थापक,शिक्षक, क्रीडा आदीसह इतर क्षेत्रातील जेसी चे आजी ,माजी अधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जेसी प्रफुल्ल पारेख तर जेसी मयूर करवा यांनी उपस्थिताचे आभार व्यक्त करून समारोप केला.
तसेच झोन १३ चे अध्यक्ष जेसी जितेंद्र बोरा, सौरभ बरडिया, झोनचे अधिकारी चैतन्य भुजंग, आदित्य मार्कंडेय ऋषभ शाह, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष जेसी प्रतीक महाजन, प्रकल्प संयोजक जेसी सुनील शेंद्रे , माजी अध्यक्ष जेसी चंद्रशेखर महाजन, सुनिल मराठे, योगेश गवांदे,किरण बोरसे, योगेश मालुंजकर, पराग कुलकर्णी, नीलेश तिवारी, सतीश वाघ, संदीप भोजने, किरण सानप, रवी जगताप, अंबादास अहिरे, जुनेद शेख, फारुख पिंजारी आदींनी मेहनत घेतली.कार्यक्रमासाठी मा.नगरसेवक सलीम शेख, माधुरी गणेश बोलकर यांचे सहकार्य लाभले.

