नाशिक मिरर :सातपूर वृत्तसेवा
सातपुर औद्योगिक वसाहती मधील स्वारबाबानगर मध्ये राधाकृष्ण हाॅटेल मागे , कांबळेवाडी परीसरातुन वाहत जाणाऱ्या नासर्डी नदीच्या पात्रात रविवार दि.५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुरुष जातीचे एक मृत अर्भक सापडले. यामुळे सातपूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून, नुकतेच जन्मलेल्या अर्भकाला फेकणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी सातपूरकराणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नासर्डी नदी पात्रातून अर्भक वाहुन जात असल्याचा याच परीसरातील गौतम निकम, राजु पांडे, गणेश रोकडे यांनी दुपारच्या सुमारास हे अर्भक वाहुन येत असल्याचे बघितले. त्यांनी तात्काळ सातपुर पोलिस स्टेशन मध्ये याविषयी माहिती कळवली. पोलिस निरीक्षक सतिष घोटेकर, पोलिस उपनिरीक्षक राजु पठाण आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून, या मृत अर्भकाचा पंचनामा केला. तात्काळ सदर मृत अर्भक हे जिल्हा रूग्णालयात पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.सदर अर्भक पुरुष जातीचे असून अनैतिक संबंधातून जन्म झाला असल्याचे व केलेले कृत्य कोणाला माहिती होऊ नये यासाठी नदी पात्रात फेकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.सदर अर्भक ५ ते ६ तासाचेच आहे. पोलिसांनी परीसरातील नागरिकांकडुन अधिक माहिती घेत अशा घटनेविषयी नागरिकांना संशय आल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.
या अगोदरही सातपुर शहरातिल बारागाड्या यात्रोत्सव गुडी पाडव्याच्या यात्रेतच सातपुर गावातील एका जुन्या शाळेत सोडून दिले होते.या इमारतीत अर्भकाचा कुत्र्यांनी लचके तोडले होते. तसेच श्रमिकनगर, बजरंग नगर, महादेव नगर, अश्या अनेक ठीकाणी घटना घडलेल्या आहे. मात्र या घटनांमधील नराधमांचा तपास लागलेला नाही. यामुळे नागरीकांमधुन रोष व्यक्त होत आहे.
एकदिवशीय जन्मलेला मुलगा असुन, कोणीतरी अज्ञात महिलेने बालकाला जन्म देवुन, अशा माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. सातपूर व नाशिक परिसरात आपल्या शेजारी अथवा कॉलनी मध्ये महिला गरोदर होती, परंतु अचानकपणे प्रेग्नंट झाली व मूल दगावले असे काही तस्यम कारण समजले तर सातपूर पोलिसांशी संपर्क करावा,सदर माहिती द्वारें संबधीताची चौकशी करून आरोपी पर्यंत पोहचता येईल.– सतिष घोटेकर,पोलीस निरीक्षक , सातपूर पोलीस स्टेशन

