नाशिक मिरर :वृत्तसेवा
ऑनलाइन रोलेट गेमच्या नादी लागून सातपूरच्या एका तरुणाने थेट घरातील बांधकाम कामासाठी जमवलेली सात लाख रुपये रोकड घेऊन पळून गेल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. रोलेट चालवनाऱ्यावर कारवाई करत मुलाचा शोध लागावा यासाठी आज बुधवारी (दि.२) घरातून पळून गेलेल्या तरुणाच्या पालकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार वजा अर्ज केला आहे.
वामन महादू सरोदे (रा.सातपूर ) यांचा मुलगा सोमनाथ सरोदे हा रोलेट गेमच्या आहारी गेला आहे. रोलेटगेम मुळे त्याच्यावर प्रचंड कर्ज झाल्यामुळे त्याने घरातून घर बांधकामासाठी जमवलेली ७ लाख रुपयाची रक्कम घेऊन बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही देण्यात आली. मात्र सातपूर पोलिसांनाही अपयश आले येत आहे. सोमनाथला अद्याप शोधू शकले नाहीत.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर चाप बसवण्यात थोड्याफार प्रमाणात यश मिळवले असले तरी मात्र रोलेट सारख्या ऑनलाइन गेमने मात्र डोके वर काढले आहे.गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे घडण्यासाठी प्रवृत्त करणारा हा रोलेट गेम शहर व ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून सर्रास सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे असंख्य तरुणांचे आयुष्य या ऑनलाईन जुगारामुळे उद्ध्वस्त झाले आहे. वाढलेले कर्ज आणि त्याच्या परतफेडीसाठी केलेले गुन्हेगारी, नैराश्यातून केलेली आत्महत्या असे चक्र जुगारामुळे अव्याहतपणे फिरत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.अवैध धंद्यावर चाप बसवण्याचा विडा उचलणाऱ्या ग्रामीणसह नाशिक पोलीस आयुक्त यावर काय कारवाई करता याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये सध्या रोलेटचा कॅन्सर पसरतोय. हळूहळू हा रोलेटचा कॅन्सर नाशिक मध्ये आपले प्रस्थ घट्ट करीत आहे. रोलेट मुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले अनेकांच्या संसाराची राख रांगोळी या रोलेट मुळे झाली. अनेकांनी आत्महत्या केल्या आहे. अनेकजण कर्जबाजारी झाले आहे. अनेक तरुण घरातून निघून गेले आहे. शहरातील बड्या हॉटेल्समध्ये, रस्त्यावरील चहा तसेच पान टपरी, तवाळखोरांचा अड्डा याठिकाणी सर्रास हा रोलेट गेम सुरु असल्याचे चित्र आहे.
गत वर्षी तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी रोलेट किंग कैलास शहा याच्या मुसक्या आवळत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. मात्र सद्यस्थितीत ग्रामीण सह शहरी भागात यागेमने पुन्हा डोके वर काढले असून रोलेट किंग मोकाट फिरत आहे.त्यामुळे सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन वास्तूचे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले.
सातपूरमध्ये निखिल पाटील नामक व्यक्ती हा रोलेट गेम चालवत असून सातपूरसह नाशिक शहरात ठिकठिकाणी असे अनेक निखिल पाटील असून त्यांनी रोलेटचे जाळे पसरवले आहे. निखिल पाटील यासह डझनभर रोलेट चालकांमुळे तरुण वर्ग त्याच्या आहारी जात आहे. अशा मुलांना शोधून कारवाई कारवाई करावी.- वामन महादू सरोदे, तक्रारदार
