नाशिक मिरर, दि.५जुलै. मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम कॉलेज नाशिक महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका स्वाती पवार-कोल्हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी मानसशास्त्र या विषयात Ph.D पदवी प्रदान केली त्यांनी पौगंडावस्था आणि प्रौढावस्थेतील सकारात्मक भाव, चारीञ सद्गुण आणि आनंद यांच्यातील तुलनात्मक अभ्यास (Positive Affect,Character Strength and Happiness among Adolescents and Adults) या विषयात संशोधन केले त्यांना पुणे विद्यापीठाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, चांदवड तालुका संचालक आमदार उत्तम बाबा भालेराव, महाविद्यालयीन शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे सर ,माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.एस के शिंदे सर, के.टी.एच.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.बी. गायकवाड यांनी अभिनंदन केले. तसेच विटावे ता.चांदवड जि.नाशिक परिसरातील सर्व नागरीक, पवार व कोल्हे परिवार सगळ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
