नाशिक मिरर : 
महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिली.याबाबत महावितरण चे वरिष्ठ अधिकारी व शासकीय अधिकारी यांनीही यास दुजोरा दिला आहे.
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी निवृत्ती बोराडे यांनी वीज बिल भरणा केला असून लाईट जोडणी करण्यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता बोरकर यांना फोन केला होता. याबाबत बोरकर यांनी शेतकऱ्यांस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको करत संबंधित मुजोर अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.त्यावेळी महावितरण चे जिल्हा कार्यकारी अभियंता व शासकीय अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यास निलंबन करण्याचे आश्वासन दिले होते.छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी देखील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होतो.
याबाबत विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांस निलंबन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन दिले होते.
आज याबाबतचा निर्णय होत अभिनय बोरकर यांना निलंबित केले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिली.याबाबत दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सर्वपक्षीय नेते व तालुक्यातील एकजुटीचा विजय असल्याचे आनंद व्यक्त केला जात आहे.

बातम्या

Don`t copy text!