शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन

शिवसेनेच्या दुसऱ्या आक्रमक महिला नगरसेविकाचे निधनाने शिवसेनेला धक्का

नाशिक मिरर : नाशिक मधील शिवसेनेच्या जेष्ट नगरसेविका सत्यभामा लक्ष्मणराव गाडेकर ( ५९ ) यांचे रविवारी ( दि.९ ) रात्री दहा वाजेच्या सुमाराला  कोरोनामुळे निधन झाले.शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.मागील दहा दिवसांपासून त्या कोरोनाशी संघर्ष करीत होत्या. त्यांच्या पच्यात पती ,दोन मुले ,मुलगी , सुना ,नातवंडे असा परिवार होता.
सत्यभामा गाडेकर यांची  राजकीय कारकीर्द नाशिक महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुक १९९२  सुरुवात झाली.यानंतर २००७ , २०१७ मध्ये देखील निवडून आल्या. ठाकरे कुटुंबातील सदस्यासोबत त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेनेत त्यांच्या कारकिर्दीला १९९२ पासून सुरुवात झाली.नगरसेविका , महापालिका सभागृह नेत्या , स्थायी समिती सदस्या अशी त्यांनी महत्वाची पदे भूषवली होती .मात्र त्यांना खरी ओळख अन लोकाभिमुखता ही शिवसेनेच्या पाहिल्या महिला नाशिक जिल्हाप्रमुख तसेच पाहिल्या उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमूख पदावर कामकाज करतांना मिळाली. शिवसेना तसेच सर्व राजकीय पक्षात त्यांना आक्रमक , चळवळीच्या नेत्या म्हणून ओळखले जाते. त्यांची राजकीय वाटचाल अतिशय संघर्षमय राहिली आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका  कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले.यानंतर आता नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाले. त्यामुळे कोरोनामुळे शिवसेनेला आपल्या दोन आक्रमक नगरसेविकांना गमवावे लागले.

सत्यभामा गाडेकर यांचे सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याबाबचे ठिया आंदोलन हे शेवटचे आंदोलन ठरले.त्यांनी नवीन बिटको रुग्णालयातील धूळखात पडलेले सिटी स्कॅन मशीन तातडीने सुरु करावे अशी मागणी केली होती. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे नगरसेविका गाडेकर यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच सिटी स्कॅन मशीन सुरू झाले.

बातम्या

Don`t copy text!