नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील हिरावाडीतील एका महिलेचा पतंगीच्या मांज्या गळ्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना दि २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हिरावाडी मध्ये राहणाऱ्या भारती मारुती जाधव या द्वारका उड्डाणपुलावरून हिरावाडी केले जात होत्या तेव्हा त्यांच्या गळ्यात मांजा अडकल्याने त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली होती.व गळा कापला केला होतो. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याची जखम इतकी गंभीर होती की ,उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा मांजा नक्की नॉयलॉन चा होता की, दुसरा याबाबत पोलिस शोध घेत असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामरात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बातम्या

Don`t copy text!