८ डिसेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला छावा क्रांतिवीर सेनेचा चा सुद्धा जाहीर’पाठिंबा’
नाशिक मिरर वेबटीम : केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी आहे, म्हणून शेतकरी व कामगार विरोधी कायदा या देशात केले आहे.यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे शेतकरी व कामगार यांच्या विरोधात कायदे आणून केंद्र शासनाने गोरगरीब नागरिकांचे कंबरडे च मोडले आहे. मोदी सरकार फक्त ‘व्यापारी’ व उद्योग धार्जिणे निर्णय घेत असून कृषिप्रधान देशांमध्ये शेतकरी विरोधी कायदा करून या देशातील शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत आहे. हे तात्काळ थांबवून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मुंबई नगरीत आयोजित कार्यकर्ता व सदस्य प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी केली.
केंद्र सरकारला आपल्या सडेतोड भाषणातुन ठणकावले.तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा दोघांनाही विनंतीपूर्वक निवेदन केले आहे की, या देशातील शेतकऱ्यांनी आपल्याला शेतकऱ्याला चांगले दिवस येतील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल असेल त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेल या आशेने आपणास या देशाची सत्ता दिली. परंतु आपण या सत्तेचा दुरुपयोग करून शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्याला अडचणीत आणून त्याला संपवणारे कायदे बनवत आहे. याचा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जाहीर निषेध केला आहे. आपले सरकार ‘अदानी-अंबानीच्या’ घशात भारताला घालण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण करत आहेत. त्यामुळे आपल्या वरील विश्वास सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही . सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सुरू आहे. त्या विरोधात भारत देशातील सर्व नागरिकांनी आता पेटून उठले पाहिजे. त्या विरोधात दिल्लीचे तक्त हलवण्यासाठी पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी दिल्लीत सात दिवसापासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे सरकार हदरले आहे. दोन शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव दिला आहे. या आंदोलनास व दि.०८ डिसेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला छावा क्रांतिवीर सेनेचा चा सुद्धा जाहीर’पाठिंबा’ आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलन करणार आहे.
आम्ही शेतकऱ्यांची पोरं. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू…!!*
श्री.करण गायकर
संस्थापक अध्यक्ष
छावा क्रांतिवीर सेना,महाराष्ट्र राज्य
