नाशिक मिरर :राजू अनमोला प्रतिनिधी

शिक्षक दिनानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने जिल्ह्यातील महाविद्यालय, खाजगी, मनपा प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील,आश्रमशाळा मधील नवरत्न शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यसरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसे शिक्षक सेनेचे राज्यसरचिटणीस प्रकाश सोनवणे ,मनसे उपाध्यक्ष नामदेव पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांचे हस्ते सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

आदर्श समाज घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे.शिक्षक आयुष्यभर सुसंस्कारीत पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत आहे. आम्ही गुरुजनांचे आदर करतअसे प्रतिपादन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यसरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी केले .याप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील निवडक नवरत्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेनेच्या वतीने दिला जाणारा ज्ञानवीर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रा. नानासाहेब दाते (कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओझर, निफाड), मीरा फडोळ (जनता विद्यालय,ग्रंथपाल, इगतपुरी, मुख्याध्यापक सुभाष भामरे(शहीद राजगुरू माध्यमिक विद्यालय देवडोंगरा,त्र्यंबकेश्वर), अमोल जोशी(पेठे विद्यालय,रविवार कारंजा, नाशिक),सचिन पाटील(नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव,चांदवड),किशोर राणे, उन्नती माध्यमिक विद्यालय, पंचवटी, नाशिक) तन्वीर इस्तक जाहागीरदार ,इंग्लिश मीडियम स्कूल ,मुंडेगाव, इगतपुरी) रुपेश शांताराम सोनवणे,नवरचना प्राथमिक विद्यालय, गंगापूर रोड ,खाजगी प्राथमिक) गायत्री भास्कर सोनवणे मनपा शाळा क्रमांक- 10 ,पंचवटी) इत्यादींना ट्राफि,प्रमाणपत्र,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी सत्कारमूर्तीच्या वतीने प्राध्यापक नानासाहेब दाते व श्रीमती गायत्री सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे , यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मनसेचे नेते पदाधिकारी सत्कार यांचाही सत्कार मान्यवारांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाअध्यक्ष रघुनाथ हळदे, प्रास्ताविक जिल्हासरचिटणीस वासुदेव बधान, आभार महानगर अध्यक्ष सुरेश खांडबहाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ हाळदे, जिल्हासरचिटणीस वासुदेव बधान, मनपाअध्यक्ष सुरेश खांडबहाले,सरचिटणीस शिवाजी शिंदे, सुभाष पवार , चिन्मय देशपांडे. वाय झेड पाटील ,राजेंद्र जाधव, राजभोज सर, एम.एन.पटेल यांनी परिश्रम केले.

बातम्या

Don`t copy text!