जळगांव : नाशिक मिरर वृत्तसेवा
मोटरसायकलवर येऊन तोंडावर स्प्रे मारून एक व्यापाऱ्याचे २ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना २७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.
अमळनेर येथील सिंधी कॉलनी येथील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद नागदेव यांचे अमळनेर शहरात प्रॉव्हिजन दुकान असून २७ रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून दुकानातील हिशोब केलेली २ लाख रुपयांची रक्कम बॅग मध्ये भरून घरी जायला निघाले, मोटरसायकलवर मागे त्यांचा भाऊ बसलेला होता चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ आले असताना, अचानक मागाहून एक मोटरसायकलवर तिघे जण आले. आणि त्यांनी त्यांच्या हातातील स्प्रे दोघा भावांच्या तोंडावर मारला स्प्रे मुळे दोघे गोंधळले.आणि तेव्हड्यात तिघांनी २ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून मोटरसायकल वर पळ काढला जितेंद्र नागदेव यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.
