जळगाव : नाशिक मिरर वृत्तसेवा : जळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे आज दि.२९ ऑक्टोबर रोजी दिली आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव महापालिकेत राजकीय घडमोडी घडत आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ चर्चा असलेल्या उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे हे आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री राजीनामा देण्याचे आदेश केले होते. त्यानुसार डॉ. सोनवणे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिला.
