मोबाईल अप्लिकेशन शुभारंभ

नाशिक मिरर वृत्तसेवा:

विजयादशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्यातील १५१ तालूक्याची विस्तृत कार्यकारिणी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप, उपाध्यक्ष विनायकराव पवार, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चिटणीस प्रमोद जाधव, महिला प्रतिनिधी भारतीताई पाटील यांच्या आॅनलाईन उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे “अखिल भारतीय मराठा महासंघ” या नावाने मोबाईल अॅप चा शुभारंभ करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा ते ध्येय धोरणे, शैक्षणिक, व्यवसाय व शेती संबंधित शासकीय योजना, व अन्य परिपूर्ण माहिती असणार्‍या अॅपची समाजासाठी उपयुक्तता असेल. गुगल प्ले वर देखील सदर अप्लिकेशन १ नोव्हेंबर पासून दिसणार आहे. व सर्वांना डाउनलोड करता येणार आहे. मराठा महासंघाच्या १२० व्या वर्धापनदिनी प्रतिवर्षाप्रमाणे शस्त्रे पूजन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण लढ्यात पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी राज्यभर दौरा नियोजन करण्यात आले आहे. सदर अप्लिकेशन साठी राजेंद्र कोंढरे, विनायक पवार, दिलीप जगताप, वसंत मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले, व प्रमोद जाधव, अतिष गायकवाड, योगेश पाटील, दिव्यांक सावंत, उमेश कोईनकर व गौरव दहाले यांनी अथक परिश्रम घेऊन समाज उपयोगी अप्लिकेशन बनविले आहे.

बातम्या

Don`t copy text!