नाशिक मिरर: दि.२९ आज सिडको शिवशक्ती चौक, परिसरात ड्रेनेजचे काम चालू असताना भूमिगत विजेची वायर तुटल्याने युवकाला शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्याचा भाऊ जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिडकोतील शिवशक्ती चौकातील नानाजी जगताप कुटूंबा समवेत राहतात. या भागात ड्रेनेजचे काम सुरू होते. यात जेसीबी च्या धक्याने भूमीगत वायर तुटली होती. आज (गुरुवार) सकाळी धीरज जगताप (वय २५) हा पाणी मारत असताना विदयुत तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ अमोल जगताप (वय २८) त्याला वाचवायला गेला असता, त्यालाही शॉक लागून तो जखमी झाला. त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
