कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘वनाधिपती’ अशी उपाधी देऊन गौरविलेले राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री (दि.२३) रात्री निधन झाले. देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार आणि विनायकदादा यांची जुनी मैत्री होती. पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी दादा एक होते. दादांच्या निधनाने त्यांनाही धक्का बसला. कोरोनाचा प्रार्दुभावमुळे त्यांना अंत्ययात्रेला येता आले नाही. त्यामुळे पवार यांनी बुधवारी (दि.२८) त्यांच्या  नाशिकमधील ‘कदंबवन’ निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

बातम्या

Don`t copy text!