नाशिक मिरर वेबटीम : प्रदीप कापसे निफाड प्रतिनिधी
शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने शेतकरी संपवण्याचे उद्योग चालवले असून ते कायदे त्वरित रद्द करावे, शेतकरी कष्टकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, दहा वर्षांपूर्वी बांधलेली घरे कायम करण्यात यावे,दिव्यांग व विधवा महिलांचा निधी त्वरित द्यावा या शेतीसाठी दिवसां वीज द्यावी ,या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शांतीनगर चौफुलीवरून निफाड तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शरद घोरपडे यांना सादर केले. कजबे सुकेने येथील गट नंबर ८८८ व ५७५ गट नंबर २ ची पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थी साठी घरकुल बांधण्यासाठी संबंधित विभागाकडून जागेची परवानगी मिळण्यासाठी त्वरित जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव तयार करून पाठवण्यात यावा , कोरोनाच्या लॉकडाऊन च्या काळातील सर्वांची वीजबिल माफ करण्यात यावे, शेतकरी विरोधी कायदे आणि शेतकरी आणि सामान्य जनतेचे वीज बिल दर प्रचंड वाढवणारे प्रस्ताव विधेयक रद्द करण्यात यावे, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मुख्यालय कार्यालयात गैरहजर राहत असल्याने त्यांचे मुख्यालयतील भत्ते व इतर भत्ते त्वरित देणे बंद करावे, अरेरावीची भाषा करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, निफाड नगरपरिषदेने निफाड येथील रहिवाशांना आरओ चे शुद्ध मोफत पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, किसान सन्मान योजना राबवितांना झालेल्या गोंधळात केंद्र सरकार जबाबदार असून काही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांकडून आर्थिक मदत वसूल करण्यात येत असून, अशी वसुली थांबवण्यात यावी, गाव नमुना ११ पीक पाहणी तलाठ्याच्या दफ्तरी नसल्याने अशा तलाठ्यांवर खोटी माहिती सादर केल्याबद्दल कारवाई करण्यात येऊन , दरवर्षी गाव नमुना नंबर ११ तयार करण्यात यावा, रोजगार हमीचे एक ही कामगार कामावर नाही तरी निफाड तालुक्यातील अवैधरित्या कामे ठेकेदारी पद्धतीने चालू आहे, अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी उत्तमराव निरभवणे उपजिल्हाप्रमुख आम आदमी पार्टी , आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचिव प्रभाकर वाईकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार महिलांचा मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निफाड तहसील कार्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आम आदमी पार्टीचे चंद्रकांत सांगळे, संतोष पगारे, यांनी मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी सुरेश दरेकर ,सागर खडताळे, भिमराज साळुंखे ,अशोक जाधव, वाल्मीक कापसे ,बाळासाहेब आहिरे,रंगनाथ ठाकूर ,पुंडलीक वाघमारे, राजेंद्र बागुल, नसीर पटेल ,निवृत्ती पवार, पुंडलिक शिंदे ,संजय गांगुर्डे, अतुल शिंगोटे, सोमनाथ सोनवणे, शंकर ठाकूर, दिलीप गोरे, मंगल नवघरे, जिजाबाई हबरे,फुलाबाई पठारे, आदी महिला व पुरुष उपस्थित होते .निफाड चे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होतो.

बातम्या

Don`t copy text!