सातपूर :नाशिक मिरर वेबटीम सातपुर कॉलनी येथील श्रीकृष्णनगरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ हनुमंत जाधव वय (४२) यांनी दि.२७ रोजी पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पाठोपाठ दुसऱ्याा दिवशी प्रबुद्धनगर येथील युवक परमेश्वर प्रकाश वाघमारे वय २१ वर्षे महालक्ष्मी चौक प्रबुद्धनगर सातपूर यांनी दि.२८ रोजी शनिवार रोजी सकाळी १० वाजता घरच्या छताच्या लाकडी ओडक्याल्या वायरने बांधून गळफांस घेउन आत्महत्या केली.तर तिसरी घटना आज दि.२९ नोव्हेंबर रोजी पहाटे च्या सुमारास घरात कोणी नसतानी पत्नी माहेरी गेली असतांनी विश्वास नगर येथील स्वप्निल भरत कदम (वय ३५ )राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नसून पुढील तपास पोलिस करत आहेत. सर्व घटना बाबत अकस्मात मृत्यू ची नोंद सातपूर पोलीस स्टशेन मध्ये करण्यात आली आहे.सदर आमहत्या कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आदी कारणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.सातपूर परिसरात यामुळे खळबळ उडालेली दिसून येत आहे.
