प्रामाणिकपणा पाहून रा.यु.कॉ कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांनी केला कर्मचाऱ्यांचा सत्कार

नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील भावीन व्हील्समध्ये गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाकडून कर्मचारी (अकाऊंट) ला १ हजार रुपये जास्तीचे गेले होते . सदर कर्मचारी यांनी फोन करू ग्राहकांला जास्तीचे पैसे परत करुन प्रामाणिक पणा दाखवून दिला. याबाबत अधिक माहिती अशी की भावीन व्हील्स मध्ये गाडी सर्व्हिसिंग केल्या नंतर येथील कर्मचारी प्रमोद पाटील यांच्याकडे अनिल कुमार गुंजाळ यांच्या कडून दि. २८ रोजी सायंकाळी गाडी सर्विसिंग चे बिल देतेवेळी ११ हजार ५०० रुपये एकूण बील झाले होते.पण अनिल कुमार यांच्याकडून नजरचुकीने एक हजार रुपये जास्तीचे देण्यात आले. त्यावर काही वेळाने हे लक्षात आल्या नंतर प्रमोद पाटील यांनी अनिल कुमार यांना फोन करून तुमचे एक हजार रुपये जास्तीचे आले आहे ते घेऊन जा असे सांगितले. यावरून प्रमोद पाटील यांचा प्रामाणिकपणा दिसून आला.सदर बाब अनिल कुमार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातपूर कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांना सांगितले. यावर कल्पेश यांनी भावीन व्हील्स चे कर्मचारी प्रमोद पाटील यांचा शोरूम मध्ये जाऊन प्रमाणिकते बद्दल सत्कार करून सन्मान केला.यावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष नवराज रामराजे व अनिल कुमार गुंजाळ, नितीन पगारे, देवेंद्र आहेर ,परेश नागपुरे, राजेश मोरे, विलास सोनवणे, निलेश मोरे आदी पदाधिकारी व मित्र मंडळी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!