नाशिक मिरर वेबटीम : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हासंघटक दिलीप पाटिल व गुलाब भोपाळे पाटिल यांनी एका पॅरालायिस झालेल्या महिलेला दहा हजार रुपयांचा धनादेश मदत देऊन माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून दिले आहे.
सातपुर अशोकनगर येथील उर्मिला शास्री या गेल्या पंधरा वर्षापासुन पॅरालायिस आजारातून ग्रस्त आहेत.त्यांच्या उपचारासाठी एक मदत म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटक दिलिप पाटिल व गुलाब भोपाळे यांनी त्यांच्या दवाखाण्याच्या उपचारासाठी दहा हजार रुपये किमतीचा धनादेश सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या उपस्थितीत देत माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहेत.
यावेळी सुनिल मौले ,पद्मराज काळे उपस्थित होते.यावेळी पॅरालायिस ग्रस्त उर्मिला शास्री यांनी दिलीप पाटिल व प्रहार संघटनेचे मनापासून आभार मानले.
