शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अनुभवातून साकारलेली संकल्पना; शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांचा Advisory Board विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार

 

नाशिक : Artificial Intelligence, Robotics, Coding, Cyber Security, Software Development आणि Information Technology यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. मात्र या संधींची ओळख विद्यार्थ्यांना योग्य वेळी झाली आणि त्यांच्यात आवश्यक कौशल्यांची जडणघडण शालेय जीवनापासूनच सुरू झाली, तरच भारताची भावी पिढी जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभी राहू शकते. हीच गरज ओळखून Calibers Infotech यांच्या वतीने ‘Wings of Fire Olympiad’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

या उपक्रमाची संकल्पना Calibers Infotechचे संस्थापक व MD संतोष निकम यांच्या दीर्घ अनुभवातून साकारली आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सुमारे १२ ते १३ वर्षे विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांसोबत काम केल्यानंतर त्यांनी IT व उद्योग क्षेत्रात सुमारे १० वर्षांचा अनुभव घेतला आहे.

 

या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करताना त्यांना शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पारंपरिक ज्ञान आणि उद्योगविश्वाला अपेक्षित असलेली आधुनिक कौशल्ये यांच्यातील दरी प्रकर्षाने जाणवली. भविष्यातील उद्योगविश्व हे केवळ पदवीपेक्षा कौशल्य, तंत्रज्ञानाची जाण, सर्जनशील विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांना अधिक महत्त्व देणार असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच Future Ready करण्याच्या उद्देशाने Wings of Fire Olympiadची संकल्पना पुढे आली.

 

*‘फक्त Olympiad नाही, तर Future Ready Generation घडविण्याचा प्रयत्न’*

 

Wings of Fire Olympiadचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेणे एवढाच नसून, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधींची ओळख करून देणे, त्यांच्या कौशल्यांना चालना देणे आणि त्यांना बदलत्या जगासाठी तयार करणे हा आहे.

 

आजच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे पर्याय पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे विस्तारले आहेत. AI, Robotics, Coding, Cyber Security, Web Technology, Software Development, Data Science, Automation यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे “मला भविष्यात काय बनायचे आहे?” यापेक्षा “भविष्यात कोणत्या संधी निर्माण होणार आहेत?” याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे आवश्यक असल्याचे संतोष निकम यांनी स्पष्ट केले.

 

*शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांचा Advisory Board*

 

*या उपक्रमाला शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून भक्कम आधार देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा Advisory Board तयार करण्यात आला आहे.*

 

या Advisory Boardमध्ये—

 

Dr. Prakash Kolhe – Founder, Manavdhan Samajik Shaikshanik Vikas Sanstha

 

Dr. Kailash Chandatray – Principal, Logmeier College; Ph.D., M.E. (Mechanical Engineering), B.E. (Production Engineering)

 

Prof. Shrihari Upasni – Principal, Guru Gobind Singh Polytechnic; Masters in Mechanical Engineering, Gold Medalist

 

Dr. Sopan Talekar – Head of Information Technology, KBTCOE; Ph.D. (CSE)

 

Dr. Gayatri Jagtap – HOD, Computer Department, Guru Gobind Singh Polytechnic; Ph.D. in Information Technology

 

Prof. Vijay Bodke – Co-ordinator & HOD, Computer Department; Ph.D.-Pursuing, M.E.

 

Mrs. Priyanka Suryavanshi – Senior Project Manager, Cognizant, Chennai

 

Mrs. Vishakha Pawar – Senior Software Developer, Intellect Soft. Solution, Mumbai

 

 

यांसारख्या शिक्षण व उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सहभाग या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त करून देत आहे.

 

*प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करिअरची एक ‘सुवर्णसंधी*

 

आज तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य भाग बनत आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, त्याला तंत्रज्ञानाची प्राथमिक समज आणि भविष्यातील कौशल्यांची ओळख असणे गरजेचे आहे. *Wings of Fire Olympiad* च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे केवळ वापरकर्ता म्हणून नव्हे, तर भविष्यातील निर्माता आणि innovator म्हणून पाहण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता, आवडी आणि भविष्यातील करिअरच्या शक्यता यांचा विचार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पालक व शिक्षकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन

 

विद्यार्थ्यांच्या करिअरची तयारी दहावी-बारावीनंतर सुरू न करता शालेय जीवनापासूनच सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

“आजची छोटीशी ओळख उद्याच्या मोठ्या करिअरची सुरुवात ठरू शकते,” या विचारातून Wings of Fire Olympiad विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

*Registration Started*

 

Wings of Fire Olympiadसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून, महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन भविष्यातील तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधींची ओळख करून घ्यावी, असे आवाहन Calibers Infotechच्या वतीने करण्यात आले आहे.

 

🌐 अधिक माहिती व Registration :

*www.wingsoffireolympiad.com*

 

“आजचा सहभाग… उद्याच्या करिअरची दिशा!”

 

*Wings of Fire Olympiad Building Future Ready Students*

*An Initiative by Calibers Infotech, Nashik*

बातम्या

Don`t copy text!