नाशिक मिरर वेबटीम : सातपूर परिसरात गंगापूर -महिरवणी रोड वर एका धावत्या चारचाकी वाहनाने दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेऊन वाहन चालक १०० टक्के जळाल्याची घटना घडली होती.सदर व्यक्ती उपचार दरम्यान जिल्हा रुग्णालयात रात्री १२ वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कैलास निवृत्ती शिंदे (वय ३९ रा.वरचे चूचाळे, पाणीची टाकी जवळ,नाशिक) हे मुंबई वरून आपल्या मालवाहतूक चारचाकी महिंद्रा बँलेरॉ गाडी (एम.एच१५ एफव्ही ७९३५) गंगापूर – महिरवणी रोड वरून शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आपल्या मावस भावाला भेटायला जात असतानी वासळी व पिंपळगाव शिवाजवळ गाडीला अचानकपणे भीषण आग लागली.यामध्ये कैलास हे १०० टक्के जळाले आहेत.व त्याचे वाहन देखील जळून खाक झाले आहे.सदर घटनेची महिती सर्वात प्रथम वासळी गावातील शिवसेनेचे पदाधिकारी शांताराम चव्हाण यांना समजली चव्हाण यांनी सातपूर पोलीस स्टेशन व अग्निशमन दलास सदर घटनेची माहिती कळवली.अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचवून आग विझवली.
सदर गाडी आग लागल्या नंतर कैलास शिंदे यांनी आग लागल्या गाडीतून आपली सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.परंतु सीट बेल्ट मुळे सुटका होत नव्हती यामध्ये ते १०० टक्के भाजले गेले. तरी देखील आगी मध्ये शीट बेल्ट तुटल्या नंतर त्यांनी आपली सुटका करून अंगाला लागलेली आग विझवण्यासाठी रस्तावर १०० फूट परंतु लोळून आग विझवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.त्यांना रात्री च्या सुमारास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार साठी दाखल केले होते.त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आपल्या गाडी लागलेली आगीची झळ दुसऱ्या गाडीला लागू नये म्हणून त्यांनी आपली गाडी आग लागल्या अवस्थेत आत मधील रोड वर उभी केली असल्याचे दिसून आले.

