कामगार कायदाचे रक्षण व कामगारांच्या हक्कासाठी संप

नाशिक मिरर वेबटीम : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात नाशिक जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे २६ नोव्हेंबर देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपात देशातील लाखो कामगार सहभागी होणार असल्याची माहिती सिटू भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सीटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल. कराड ,यांनी दिली आहे. नविन कामगार विरोधी लेबल कोड त्वरित मागे घेण्यात यावे. जुन्या कामगार कायद्याचे पुनर्स्थापना करा. कामगार विरोधी कायद्याने कामगार बेरोजगार होणार आहे.त्याच बरोबर चुकीच्या धोरणामुळे लॉक डाऊन काळात लहान मोठे उद्योग कायमचे बंद झाले आहेत. लाखो कामगार यात बेरोजगार झाले आहे. त्यांना ७५००भत्ता व दहा किलो धान्य मोफत देण्यात यावे .नवीन पेंशन योजना रद्द करा, किमान १०हजार पेन्शन देण्यात यावी.समान कामास समान वेतन देत कंत्राटी कामगारांना कायम कामगाराचा दर्जा देण्यात यावा. सार्वजनिक क्षेत्रातील खासगी करणं थांबवत नवीन नोकर भरती करण्यात यावी. कामगारांना न्याय देण्यात यावा . या मागणीसाठी व सरकारच्या विविध कामगार विरोधी धोरणाविराधात जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे २६ तारखेला देशव्यापी संप करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी दिली.या वेळी इंटक चे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सिताराम ठोंबरे,सुनंदा जरांडे, राजू देसले, मोहन देशपांडे, प्रविण पाटील,भिवाजी भावले.
व कृती समितीतील सर्व सक्रिय पदाधिकारी, उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!