छावणी पोलिसांची टेहरे गावाजवळ कार्यवाही
मालेगाव : नाशिक मिरर वेबटीम
मुंबई -आग्रा महामार्गावर टेहरे फाटा परिसरात छावणी पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हॉटेल राजधानीसमोर एका मालट्रकमध्ये पशुखाद्य गोण्यांच्या आड अवैध मद्यसाठा दडवून वाहतूक सुरू होती. त्यात बिअर, देशी विदेशी मद्याचे 498 बॉक्स आढळून आले. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. अतुल मदन नामक व्यक्तीचा माल असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा अवैध मद्यासाठा कोठून -कोठे घेऊन जात होते याबाबत तपास सुरू आहे.
