नाशिक मिरर : सातपूर कॉलनीत शुक्रवारी दि ४ मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल ६५ तोळे सोन्याचे विविध दागिने व ४५ हजार रोख रक्कम लंपास करण्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार
घर नंबर १७३८ ‘चंद्रभागा’ येथील आठ हजार वसाहत, येथे राहणारे साहेबराव नेमणार हे खासगी ठेकेदार आहे. आपल्या मूळ गावी काही कामानिमित्त नांदगाव येथे आठ दिवसापासून गेले होते.दि.५ रोजी सकाळी त्याच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडुन उघडा असल्याने या बाबतीत त्यांना शेजारच्या नागरिकांनी माहिती दिली.तसेच या बाबतीत सातपूर पोलीस यांना माहिती दिली असता बेडरूममध्ये असलेल्या कपाट फोडत कपाटात ठेवलेले ६५ तोळे सोने व ४५ हजार रोख चोरून नेले असल्याचे नेमणार यांनी पोलिसानी माहिती दिली.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी पाहणी केली.सदर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज साहाय्याने तपास सुरू आहे.
सातपूर ईएसआयसी समोरील ३ मालवाहतूक गाड्या च्या बॅटरी चोरीला :
सातपूर ईएसआयसी समोर मालवाहतूक संघटना च्या पार्किंग मध्ये लॉकडाउन पासून काम नसल्याने उभ्या असलेल्या आयसर या मालवाहतुक ट्रक मधील बॅटऱ्या व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.ऐन आर्थिक संकटात सापडले असताना सदर चोरी मुळे ट्रक मालक हवालदिल झाले आहेत.
