नाशिक मिरर : अंबड औद्योगिक वसाहतीतील कोसो इंडीया प्रा. लि. चे व्यवस्थापन व असोसिएशन ऑफ इंजीनियरींग वर्कर्स युनियन यांच्या मध्ये कामगार पगारवाढीचा त्रैवार्षिक करारावर सकारात्मक चर्चा करून दि.४ मे रोजी करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.

 

सदर वेतनवाढ करार हा कामगार सभासदांचा पदाधिका-यांवरील विश्वास व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता व शिस्त यावरील पुर्ण विश्वास, व्यवस्थापान व युनियन यामधील सलोख्याचे संबंध हयामुळे कोरोनाचे संकट असतांना सुध्दा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर वेतनवाढ करार पार पडला.

 

या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना सरासरी रू. १० हजार ५०० एवढी थेट रक्कम बेसीक वेजेस व अलाउंसेस मध्ये मिळणार असुन पहील्या वर्षी रु.६ हजार ३०० आणि दुस-या व तिस-या वर्षी प्रत्येकी रु. २ हजार १०० एवढी पगारवाढ कामगारांना मिळणार आहे. सदर करारानुसार कामगारांना रात्रपाळी भत्ता, हजेरी भत्ता, पेड हॉलीडे कामाकरीता भत्ता, कामगार कुटुंबीयांकरिता वर्षातून १ दिवस पार्टी त्याचप्रमाणे कामगारांच्या सध्याच्या मेडीकल पॉलीसीची विम्याची रक्कम ३ लाखावरून ४ लाख करण्यात आली आहे. हया पगारवाढीव्यतिरीक्त कंपनी व्यवस्थापनाने ४ कामगारांच्या मुलांना त्यांचे शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार कंपनीमध्ये काम देण्याचे मान्य करून दि.१ एप्रिल पासुन २ कामगारांचे मुलांना कायम स्वरूपी काम व २ कामगारांचे मुलांना प्रशिक्षणार्थी कामगार म्हणुन नेमणूक देण्याचे ठरविले आहे. सदर करार हा दि . १ एप्रिल २०२० ते दि ३१ मार्च २०२३ हया कालावधीसाठी असुन हया करारानुसार कोसो व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता, उत्पादक विभागाचे जनरल मॅनेजर दिनेश दळवी, औद्योगिक संबंध विभागाचे डेपुटी जनरल मॅनेजर राजन भांडारे तर युनियन तर्फे असोसिएशन ऑफ इंजीनियरींग वर्कर्स चे अध्यक्ष भुषण सांमत, सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाअध्यक्ष वर्गिस चाको, कामगार प्रतिनिधी विजय महाले, भास्कर सुरूडे, राजु काळवांडे, परसराम आंबरे यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. कराराने जास्तीत जास्त मासिक ६१हजार, भरघोस वेतनवाढ तर किमान ५३ हजार पगार कामगारांना मिळणार आहे. झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कामगार युनियनच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


 

बातम्या

Don`t copy text!