नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील जयनीक्स इंजिनिअरिंग प्रा. लि.या कंपनी मधील कामगारांना ७ हजार ५०० रुपये चा पगारवाढि चा करार करण्यात आला आहे. डायरेक्टर निखिल दिवाकर व निनाद दिवाकर यांनी बडोदा येथून सीआयटियु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ डी एल.कराड यांच्याशी ऑनलाईन मीटिंग घेऊन कामगारांच्या पगारवाढीसाठी सकारात्मक चर्चा केली.७ हजार रूपये ते ७ हजार ५०० पगारवाढ करण्याचे एकमत झाले.
दिनांक ६ में रोजी सीटु कामगार भवन खुटवड नगर येथे डॉ.डी.एल.कराड यांच्या उपस्थितीत पगारवाढीच्या करारावर सह्या करण्यात आल्या.हा करार में २०२० पासुन पुढील तीन वर्षांचा असेल. कामगारांना रू.७ हजार ते .७ हजार ५०० तसेच डीए राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता अशी पगारवाढ करण्यात आली आहे. पगरवाढीनुसार कामगारांचे एकूण पगार ३२ हजार रुपये होणार आहे.करारावर युनियनचे अध्यक्ष डॉ डी एल कराड, युनियनचे सरचिटणीस कॉ.सीताराम ठोंबरे, चिटणीस कॉ.संतोष काकडे, उपाध्यक्ष कॉ.तुकाराम सोनजे, खजिनदार कॉ.मोहन जाधव, दिनेश सतभाई व कमिटी मेंबर्स जितेंद्र पाटील, कैलास वायचाळे, राजेंद्र पाटील यांच्या सह्या आहेत.
