नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहती मधील विविध प्रकारचे कॅपॅसिटरचे उत्पादन करणाऱ्या टीडीके ईप्काँस कंपनीत ४०५ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्यात येणार असून येत्या ५ वर्षात ६०० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

आज दि ०३ फेब्रुवारी गुरुवार रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन यांचे हस्ते सातपूर औद्योगिक क्षेत्रातील मे. टीडीके इंडिया कंपनीच्या नवीन विस्तारित प्लँट चे भुमीपुजन संपन्न झाले. मे. टीडीके इंडिया ही एक मल्टीनॅशनल ईलेक्ट्रॉनीक्स कंपनी असुन एकुण उत्पादनापैकी ६५% उत्पादन विदेशात निर्यात करते. मओविमने सदर कंपनीस त्यांच्या पुढील उदयोग विस्तारासाठी सुमारे १५००० चौ.मी. जागा दिलेली असुन सदर कंपनीकडून सुमारे ४०५ करोड इतकी गुंतवणुक केली जाणार आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात अंदाजे ५०० ते ६०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नाशिक जिल्हयात दिंडोरी अक्राळे येथे जास्तीत जास्त गुंतवणुक आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ३ ते ४ मोठया कंपन्या त्या ठीकाणी येण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पुढील २ ते ३ वर्षात दिंडोरी तालुक्यातील मौजे अक्राळे, मौजे तळेगाव येथे सुमारे ३००० ते ४००० कोटीची गुंतवणुक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने मऔविम पावले अचलत असुन तसेच नाशिक जिल्हयातील नवीन नवतरुण (startup ) उदयोजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने वापर वाढण्याच्या (Electric Vehicle ecosystem build) दृष्टीने मऑविमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनबलगन यांनी दि.३ रोजी नाशिक जिल्हयातील नवउदयोजक जयेश टोपे, प्रितेश महाजन, पुष्कराज साळुंखे यांनी तयार केलेला Revamp Moto Pvt. Ltd. या Electric Vehicle startup कंपनीस भेट देऊन चर्चा केली. सदर कंपनीस जागा देण्यास मऔविमने सहमती दर्शविली आहे. अतिरीक्त दिंडोरी औदयोगिक क्षेत्रात महामंडळाकडुन सुमारे ८ एकरचा भुखंड या कंपनीस देण्याबाबत कार्यवाही सुरु असुन कंपनीसोबत सामंजस्य करार देखील करण्यात येणार आहे.

यावेळी महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, अधिक्षक अभियंता बाळासाहेब झांजे, कार्यकारी अभियंता नितीन बोरसे हे उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!