नाशिक मिरर : नाशिक शहरात व सातपूर औद्योगिक परिसरात रोजच कोविड संसर्गाने रुग्ण संख्या वाढत असून संसर्गाने रुग्ण बाधित होत आहे. सातपूर औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहत असून या परिसरातील नागरिकांना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते.

 

अनेक रुग्णांकडे लॉकडाऊन मुळे दोन वेळे पुरेसे खाण्यास नाही अशांना खाजगी रुग्णालयाचे बिल कसे भरणार या विचाराने अंगावर आज काढत असल्याचे दिसून आले आहे.यामुळे संबधित रुग्णाच्या जीवितास धोका पोहचवून रुग्ण दगावत आहे.शहरातील इतर कोविड सेंटर मध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच त्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही.

सातपूर परिसरात मोठे असे सेंटर नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व सातपूरकरांची गैरसोय होऊ नये म्हणून सातपूर येथील इएसआय रुग्णालय येथे कोविड सेंटर त्वरीत सुरु करण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली होती. हॉस्पिटल कडून प्राथमिक सुविधा केलेली आहे.परंतु सदर ठिकाणी नर्सेस स्टॉप, औषधी व ऑक्सिजन यांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे कोविड सेंटर सुरु होत नाही.मनपा आयुक्त यांची भेट घेऊन इएसआय हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरू करुन वैद्यकिय सुविधा त्‍वरित उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी सीमा हिरे यांनी केली.

बातम्या

Don`t copy text!