नाशिक मिरर वेबटीम :

कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धाचा सन्मान व कोरोना रुग्णांची सेवा,मदत करण्यासाठी शहरात शेकडो हात पुढे आले आहे.यामुळे प्रशासनाचा बराचसा ताण कमी कमी होण्यास मदत झाली. नाशिक मधील छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपले राज्य भर असलेला जनसंपर्क च्या माध्यमातून शेकडो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, सामान्य बेड चा दुसऱ्या लाटेत तुटवडा भासत असताना शहरातील विविध खाजगी शासकीय रुग्णालयात डॉक्टर शी संपर्क करून बेड उपलब्ध करून दिले.काहींना औषधे तर काहींना रेमडिसिव्हर मिळवून दिले. संघटनेचे राज्यभरात शेकडो पदाधिकारी व हजारो सदस्य असल्याने हे त्यांना करणे सहज शक्य झाले.याचं दरम्यान त्यांना पितृशोक देखील झाला.पंरतु ज्या कारणामुळे आपले वडील गेलेत त्या कारणाने इतरांचे कुटुंब उद्धवस्त होऊ नये, असे ध्येय समोर ठेवून पुन्हा जोमाने दुसऱ्या लाटेत कोरोना काळात शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथीक गोळ्या ह्या मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरत असल्याचे समजले.

याच गोष्टींची जाणीव ठेवत कै.पंढरीनाथ त्रंबक गायकर
यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रभाग क्रं ९ मध्ये मोतीवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सौजन्याने छावा क्रांतिवीर सेना व शिवसेना पक्षाच्या वतीने करण गायकर यांनी पुढाकार घेऊन सुमारे १० हजार आर्सेनिक अल्बम या गोळ्यांच्या किट चा वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्ष भरापासून कोरोनाचे मोठ्या प्रमाणात थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीच्या दृष्टीने वर्षभरापासून अनेक उपक्रम हाती घेऊन ज्यामध्ये अन्नधान्य किट,भाजीपालाचे वाटप,औषध फवारणी,रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
आजची परिस्थिती बघता मानवी शरीर सदृढ असणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने या होमिओपॅथी गोळ्या अत्यंत महत्वाच्या आहे. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून माध्यमिक शाळा कॉलेज बंद असल्या कारणाने स्कूल व्हॅन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याची जाणीव ठेवून त्यांना ही एक छोटीशी मदत म्हणून प्रभाग क्रमांक ९ मधील वाहनचालकांना अन्नधान्याचे कीटकही यावेळी वाटप करण्यात आले.याप्रसंगी मोतीवाला कॉलेजचे सर्वेसर्वा डॉ.फराज मोतीवाला , छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सोमेश्वर संस्थाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव,दिनकर कांडेकर,सविता गायकर,समाधान देवरे, निवृत्ती शिंदे सम्राट सिंग,तुषार पाटील,किरण बोरसे,अविनाश गायकर यांची या कामात साथ लाभली.

कोरोना महामारीच्या काळात पक्षीय राजकारण बाजूला सारून सर्वांनी समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन सर्व सामान्य जनतेला मदत करावी. आज आपण केलेली छोटीशी मदत ही गरजवंताला लाख मोलाची आहे – करण गायकर,संस्थापक छावा क्रांतिवीर सेना.

 

आर्सेनिक अल्बम ह्या गोळ्यांचा डोस ४ गोळ्या सकाळी उपाशीपोटी ३ दिवस व पाच वर्षा आतील बालकांनी २ गोळ्या ३ दिवस उपाशीपोटी घ्यावा
या काळात कच्चा कांदा,लसूण व कॉफी पिणे टाळावे यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते

डॉ.फराज मोतीवाला,मोतिवाला मेडिकल कॉलेज

बातम्या

Don`t copy text!