सातपूर औद्योगिक वसाहत बनली डम्पिंग ग्राऊंड ; ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

सातपूर :नाशिक मिरर वेबटीम औद्योगिक वसाहत म्हणजे डम्पिंग ग्राऊंड च आहे की काय, अशी समजुत करून ठिकठिकाणी कचऱ्याचे, अजैविक कचरा,अस्वच्छता दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीत प्रत्येक ठिकाणी मुदत बाह्य खाद्य पदार्थ,अनावश्यक कचरा,घरातील प्लस्टिक ,ओला व सुका कचरा ,अनावश्यक वस्तू, बांधकाम मलबा, तर एका अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात शेकडो मुदतबाह्य खाद्यपदार्थ शेंगदाणा चिक्की फेकली आहे. सातपूर औद्योगिक वसाहती तिल रस्त्याच्या कडेला वा मोकळ्या भूखंड वर टाकुन परिसरातील अस्वच्छता पसरवली जात आहे. सातपूर : १.सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये अशा प्रकारे कचरा व बांधकाम मलबा चे ढीग आहेत. २.सातपूर औद्योगिक वसाहत रस्त्याच्या बाजूला फेकलेला मुदतबाह्य खाद्यपदार्थ पॉकेट शेंगदाणा चिक्कीबी व डी सेक्टर मधील भागांत बांधकाम मळबा ही टाकला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावल्याने मोकाट जनावराचा मुक्त वावर वाढत आहे.औद्योगिक वसाहतीचा स्वच्छ चेहरा विद्रूप होत आहे.औद्योगिक वसाहती ला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिका व औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील वाद यामुळे या भागात अस्वच्छता पसरली जात असल्याचा आरोप उद्योजक व नागरिक करीत आहे.महापालिका व औद्योगिक महामंडळ यांनी योग्य भूमिका घेत स्वच्छता राबविण्यात येऊन परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिक करत आहे.

बातम्या

Don`t copy text!