वाहन चालवताना करावी लागते कसरत

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ;रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

नाशिक मिरर वेबटीम :
सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्याची पुरती चाळन झाली आहे.मनपा प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपात डांबर अथवा मुरूम टाकून खड्डे बुजवले जात आहे.परंतु औद्योगिक वसाहती मधील मोठमोठे मालवाहतूक वाहनांमुळे आठ दिवसांतच पुन्हा परिस्थिती जैसे थे होत आहे. पावसाळ्यात तर येथील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट असते ,खड्डा मध्ये पाणी साचत असल्याने खड्याचा अंदाज येत नाही.पाऊस उघडून महिना लोटला आहे .तरी नवीन रस्ता ची कामे सुरू झालेली नाहीत.सिएट कंपनी समोर तर रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. त्यामुळे आैद्योगिक वसाहतींत येणाऱ्या वाहनचालक व कामगारांना दररोज खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रस्त्यांवर वाहणारे पाणी मोठे खड्डे पडल्यामुळे तेथे पाणी साचून डबकी तयार झालेली दिसून येतात. सातपूर एमआयडीसीत ३१ किलोमीटरचे रस्ते आहेत, महापालिकेने हे रस्ते दुरुस्त करावे व उद्योगांना चांगली सुविधा पुरवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेला येथून सर्वाधिक कर मिळतो. पण, उद्योगांना पायाभूत सुविधांसाठी महापालिकेकडे वारंवार तक्रारी कराव्या लागतात. सातपूर मधील कॉलनी रस्त्यावर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नाशिक मधील औद्योगिक संघटना निमा च्या पदाधिकारी यांनी अनेकदा तक्रारी व मागणी करून देखील नवीन रस्ते व खड्डे बुजवण्याचे कामाकडे मनपा प्रशासन दुर्लक्षित करीत आहेत.

सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्याना मोठ्या प्रमाणातखड्डे पडले आहेत.नाशिक मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.खड्या मुळे कामगाराना समस्या ना सामोरे जावा लागत आहेत.पाठदुखी आजार वाढले असून, खड्डे चुकवताना अपघात देखील होतात. -मनोज आहिरे ,सामाजिक कार्यकर्ते सातपूर

बातम्या

Don`t copy text!