मागील ५ वर्षांपासून राबवत आहेत स्तुत उपक्रम
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपूर परिसरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे साई रुद्रा बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष , शिव सेना वाहतुक सेना उपजिल्हाप्रमुख, शिव सेना कामगार सेना जिल्हाप्रमुख ,सामाजिक कार्यकर्ते शाम फर्नाडिस यांनी आपली भाऊबीज दरवर्षीप्रमाणे घरोघरी धुणे-भांडे करणाऱ्या समाजात घरकाम म्हणून संबोधले जाणाऱ्या घरकाम करणाऱ्या बहिणीं सोबत भाऊबीज साजरी करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सातपूर भागातील गोरगरीब महिलांना साडी व माँस्कचे वाटप करून शाम यांनी भाऊबीज साजरी केली.यावेळी परिसरातील ५० घरकाम करणाऱ्या भगिनीना साडी व मास्क भेट देण्यात आली.साई रूद्रा बहुऊद्येशिय संस्थेचे संस्थापक शाम फर्नांडिस सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.वर्षभर स्व खर्चाने विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबवत असतात.असाच एक उपक्रम म्हणून त्यांनी घरोघरी धुणे,भांडीचे काम करणाऱ्या गरीब महिलासोबत भाऊबीज साजरी केली.दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उसाहाने साजरा करत असतो.सर्वत्र दिवाळी साजरी होत असते.पण काही गरीब कुटुंब यापासून दुर राहतात.या व्यक्तीना आंनद घेता यावा. या उद्देशाने सातपूर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या भगिनी सोबत भाऊबीज साजरी केली.महिलांना साडी,मिठाई व माँस्कचे वाटप करण्यात आले.यावेळी गोरगरीब महिलांनी पोलीस बांधव व शाम फर्नाडिस यांना औक्षण केले. हा उपक्रम ५ वर्षांपासून राबवत आहे.या स्तुत्य उपक्रम बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर तसेच पोलीस बांधव नंदकुमार कापसे,संजय चव्हाण, सागर गुंजाळ आदीसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
