नाशिक मिरर :
पोलीस आयुक्तांच्या आदेशनव्ये पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, जाहिरात प्रदर्शित करण्यापूर्वी पोलीस आयुक्तांची परवानगी घेऊन सदर परवानगीचा आदेश क्रमांक पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक प्रदर्शित करणेबाबत आदेश पारीत केलेले आहेत.
त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ २ व सहा. पोलीस आयुक्त विभाग ४ यांनी संयुक्तपणे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत विना परवाना लागलेले पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्स, फलक व जाहिराती फलकांवर कार्यवाही करण्यात आली. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्स, फलक, जाहीरात लावणारे एकूण २२ व्यक्तीवर सीआरपीसी १०७ प्रमाणे कार्यवाही
करण्यात आली. या कारवाईपूर्वी संबंधितांकडे परवानगी आहे किंवा नाही बाबत खात्री करण्यात आली होती. या कारवाईत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर (गुन्हे) सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोउनि शाम जाधव व १५ पोलीस अंमलदार यांनी एकत्रित कारवाई केली.
