अधिकारी व स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष

नाशिक मिरर  : सातपूर विभागामध्ये त्र्यंबकरोड-गंगापूररोडलिंकरोड वर मोतीवाला कॉलेज ते सुला वाईन सर्कल पर्यंत दुभाजकाचे काम मंजूर झाले आहे.सदर रस्तावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने सदर काम गेल्या वर्षभरापासून ठेकेदार मार्फत सुरू असून कामामध्ये अनेक चूका दिसून येत आहे.

 

त्यामुळे प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्ता सातपूर -अंबड औद्योगिक वसाहती ला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवस- रात्र अवजड वाहनांची व इतर वाहनांची रहदारी दिसून येते.परंतु यातच नियोजनशून्य दुभाजकाचा कामामुळे सदर दुभाजकच आता रहदारी अडथळे व अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. यांस सर्वस्वी स्थानिक नगरसेवक व नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाचे विभागीय अधिकारी व बांधकाम उपअभियंता जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.

पार्थ पँँलेस ते श्रमिकनगर व सातमाऊली बस स्टॉप पर्यंत चे दुभाजक चक्क रस्ताच्या बाजूला महिंद्रा कंपनी च्या भिंती ला  लागून घेण्यात येत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता दुभाजक काम पूर्ण झाल्यावर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.पंरतु सदर रस्ता दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमने झाले आहेत.रस्त्या लगत विद्युत पोल, पथदीप यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ची रस्तालगत कामगारांची वाहने अवजड वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असतात ही सर्वी अडथळे दूर करून रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसवणे आवश्यक असताना अगोदरच दुभाजक बसवण्याचा घाट घातला आहे. यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे.

 

तसेच गेल्या काही महिन्या पासून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी चे गॅस पाईप ठिक-ठीकानी रस्ता कडेला येऊन पडले आहेत. तसेच कार्बन नाका जवळील श्रीशिव छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळे लगत असणाऱ्या रस्ताच्या समोरच दुभाजक टाकण्यात आल्याने सदर ठिकाणी अपघात होत आहेत. रस्त्या दुभाजक कामात अशा अनेक त्रुटी असल्याने रस्ताने रोज प्रवास करणाऱ्या वाहनचालक ,कामगार व स्थानिक रहिवासी यांनी संताप व्यक्त केला असून सदर समस्या त्वरित सोडविण्याची मागणी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

बातम्या

Don`t copy text!