नाशिक मिरर : भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त नाटककट्टा या कला व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेच्या वतिने “स्वतंत्रता कट्टा” हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोड वरील सीएमसीएस कॉलेज मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीते साठी अमूल इंडिया चे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कारगील युद्धामधील नायक मेजर दीप चंद व वीरनारी अनिता सिंह यांनी उपस्थीत होते. तसेच रोबिनहुड आर्मीची नाशिक टिम सुद्धा कार्यक्रमात सहभागी झाली होती.कार्यक्रमात देशभक्ती पर गीत , कवीता , नाटक आणि नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं मेजर दीप चंद यांची विशेष मुलाखत, मुलाखती द्वारे कारगिल युद्धातील घटनांना उजाळा मिळाला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आलेले मेजर दीप चंद यांची मुलाखत अभिजित गायकवाड यांनी घेतली.मुलाखती द्वारे मेजर दीप चंद यांनी त्यांच्या सैनिकी आयुष्यातील थरारक घटनांबद्द्ल सांगून प्रेक्षाकांना थक्क केले. कारगील युद्धात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय व उजवा हाथ गमावला तरिही त्यांच्या आतला योद्धा त्यांनी कसा जिवंत ठेवला ह्याबद्द्ल सांगून सगळ्याना जगण्याची नवी उम्मिद दिली. उपस्थित विद्यार्थ्यांना आदर्श जिवन जगण्याचा धडा दिला .कवीता, गाणी, नाटक आणि नृत्याद्वारे नाटककट्टाच्या कलाकारांनी सामाजिक व देशभक्तीपर अशा विषय सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगिताने झाली. कार्यक्रमात नाटककट्टाच्या कवींनी कार्यक्रमाची शान वाढवली. श्रावणी, रिशू पान्डे , खुदगर्ज योगेश, झिशान खालीद, भैरवी जैन , रमेश देठे , आशिष चौधरी , निशांत देशपांडे , राजेंद्र गायकवाड यांच्या कवितांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली. कार्यक्रमात देशभक्तीला सुरांच्या भाषेत गीत गाऊन प्रेक्षाकांना सुमीत देशपांडे आणि सहकार्यानी भावुक केले . कार्यक्रमात हास्याची लहर नाटककट्टाच्या अवलिया अभिनेत्यांनी नाटक करुन आणली . राजस निकुंभ , पार्थ जाधव, महेंद्र कापडणे, साईप्रसाद शिंदे, अवतार कावळे, अक्षय शिंगोटे, सचिन राठोड, आशिष चौधरी, लीना चौधरी , अनन्या शिंदे , रमेश देठे , निशांत देशपांडे ह्यांनी नाटकात सामाजिक अडचणींना विनोदाच्या माध्यमातून दर्शवून नागरिकांना देशाप्रती जबाबदारीची जाणिव करुन दिली. कार्यक्रमात नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांचे डोळे पाणवले . दिनेष शिरसाठ, अनुज कोरी , साईप्रसाद शिंदे , सचिन राठोड, अक्षय शिंगोटे,रमेश देठे,अक्षय खुळात यांनी नृत्य सादर केले. हया संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन नाटककट्टा अध्यक्ष अक्षय खुळात , महेश बेलदार , आनंद गांगुर्डे यांनी केले. नाटककट्टा प्रस्तुत ‘स्वतंत्रता कट्टा’ ह्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.
